श्री गणेश फरसाण कंपनीला आग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारारोड, ता. कोरेगाव येथील श्रीगणेश फरसाणा कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत सर्व साहित्य व मशीनरीज् जळून खाक झाली असून तब्बल दोन कोटींचे नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सकाळी श्रीगणेश कंपनीच्या युनिटमधून अचानक आगीमुळे धुराचे लोळ पसरु लागली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिकचे रॅपर असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनीचे मालक कुलकर्णी यांनी अग्नीशामक दलाला बोलताने त्यांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत सर्व कच्चा माल, प्लास्टिक रॅपर, मशीनरीज् जळून खाक झाली. यामध्ये कंपनीचे तब्बल दोन कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणत्याही स्वरुपाची जीवीत हानी झाली नाही.

error: Content is protected !!