सख्या बहीण आणि भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :पाटण तालुक्यातील रोमन वाडी (येराड) येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडून सख्खी बहीण आणि भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (रा. रोमनवाडी) यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार (रा काठी ता पाटण) हे आपली पत्नी व दोन मुलांसमवेत आले होते. यावेळी सौरभ अनिल पवार (वय १६) पायल अनिल पवार (वय १४) ही दोन मुले पळत शेततळ्याकडे गेली होती. यावेळी सौरवचा शेततळ्यात पाय घसरल्याने तो बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण पायल गेली. यावेळी ती सुद्धा पाण्यात बुडाली. हा घडत असलेला प्रकार सचिन जाधव व मुलाचे आई-वडील यांना समजातच त्यांनी लगेचच तळ्याच्या दिशेनं धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्हीही मुले पाण्यात बुडालेली होती. यानंतर रात्री ८ वाजता शिरळ येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. मुलगा रेठरे येथे आय टी आय व मुलगी विजयनगर येथे इयत्ता आठवीत शिकत होती. भाऊ-बहिणीच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!