वायसी महाविद्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या एसटी बसेस बंद आहेत. कॉलेजवर परीक्षेच्या वेळेवर पोहचता येत नाही. ऑनलाईन शिकवणी झाली असताना दोन दिवसापूर्वी कॉलेज प्रशासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत येथील स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले.

परीक्षा या ऑनलाईनच घेण्यात याव्यात अशी मागणी केली. यामुळे कॉलेजच्या गेटवर काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. पोलीस प्रशासनाने विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासन यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली.

error: Content is protected !!