सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिरवळ येथील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर पुणे येथील मटका किंग संजय सुभाष पाटोळे (वय ३६,रा.अपर,बिबवेवाडी,पुणे) याचा गोळी घालून खून केल्याप्रकरणी पुणे येथील एका प्रकरणामध्ये सात वर्षांपासून मोक्क्याच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या सराईत गुन्हेगार मुख्य सूत्रधारासह सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी गुन्हा घडताच १२ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये फूलमळयालगत एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय सुभाष पाटोळे याचा अज्ञाताने गोळी मारून भरदिवसा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिरवळसह पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. शिरवळ परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण केल्याचे बिल मृत संजय पाटोळे याच्या खिशामध्ये मिळताच शिरवळ पोलीस,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुतावरून स्वर्ग गाठत अवघ्या खुनाचा गुन्हा घटना घडल्यापासून १२ तासामध्ये उघडकीस आणत खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व सन २०१५ सालापासून पुणे पोलीसांच्या कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमधील रेकॉर्डवरील मोक्क्याच्या गुन्हयातील फरार आरोपी तबरेज मेहमूद सुतार (वय ३१,रा. वरखडेनगर,कात्रज ,पुणे)याचा सहभाग तपासामध्ये असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सातारा पोलीसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत खून करून फरार झालेल्या तबरेज सुतार व त्याचा एक साथीदार किरण बबनराव साळुंखे (रा.आंबेगाव पठार,पुणे) वाहनासह मुसक्या फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर पोलीसांनी नाकाबंदी करीत अग्निशस्त्र,रोख रक्कम यांच्यासहित मुसक्या आवळल्या.
You must be logged in to post a comment.