महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; माजी नगरसेवकासह चार जणांना अटक

महाबळेश्वर,(भूमिशिल्प वृत्तसेवा):पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वर मध्ये करोङो रुपयांची किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी सातारा,महाबळेश्वर व मेढा वनविभागाच्या संयुक्त कारवाईत महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह संतोष खुशालचंद्र जैन रा.निसर्ग विहार रत्नागिरी,संजय जयराम सुर्वे रा.मेढा,अनिल अर्जुन ओंबळे रा.बोंङार वाङी,ता.जावली अशा एकुण चार जणांना व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

वनविभागाच्या गुप्त माहिती नुसार सोमवारी सायंकाळी साङेपाच वाजल्याच्या दरम्यान माचुतर येथे छापा टाकून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आलेली आहे.या प्रकरणात महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश रामचंद्र पाटील यांच्या सह एकुण चार जणांना अटक करण्यात आली असुन वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कारवाई करीत त्यांना मंगळवारी दुपारी वन विभागाकङुन वाई येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचे वजन साङेसहा किलो असुन त्याचे बाजार मुल्य साङेसहा कोटी रुपए इतके आहे.व्हेल माशाच्या उलटीला अंबरग्रीस म्हणतात.ही एक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तु आहे.तिचा वापर परफ्युम,औषधे आणि इतर अनेक उत्पादनांमध्ये केला जातो.वन विभागाच्या या कारवाईमुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीला आळा बसण्याची आशा आहे.

error: Content is protected !!