सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी नौटंकी बंद करावी, त्यांनी सरकारमधून बाहेर पडून आंदोलन करावं, असं आव्हान गोरे यांनी भुजबळांना दिले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. पण ही त्यांची नौटंकी सुरु आहे. भुजबळ यांचा सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि मगच समाजासाठी भूमिका मांडावी, असं आव्हानच जयकुमार गोरे यांनी भुजबळांना दिलं आहे. ते सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्र्याला मोठे अधिकार असतात. सत्तेत असल्यावर जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. मंत्र्यांनी आंदोलन करायचं नसतं, असा टोलाही गोरे यांनी भुजबळांना लगावला होता.
गोरे म्हणाले, राज्यसरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द झालं आहे. पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं गोरे यांनी जाहीर केलं आहे.
You must be logged in to post a comment.