सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा सावट असल्याने यंदा सातारा शहरात तसेच महाबळेश्वर, पाचगणी, कराडसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी ख्रिसमस सण शांततेत साजरा करण्यात आला. ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये येऊन पारंपरिक पद्धतीने प्रार्थना करत हा सण साजरा केला.
येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस नाताळ म्हणून साजरा केला जातो. या सणाला ख्रिश्चन बांधवांमध्ये मोठे महत्व आहे. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये एकत्र येत मेणबत्तीच्या उजेडात प्रार्थना केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ख्र्रिसमसनिमित्त येथील टिळक मेमोरियल चर्च, सदर बझारमधील सेंट थॉमस तसेच विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली.
कोरोनामुळे हा सण उत्साहात साजरा करू नये, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला होता. या आदेशाने ख्रिश्चन बांधवांकडून पालन करण्यात आले.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीमध्ये नाताळनिमित्त पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. येथील मुख्य बाजारपेठ सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईत उजळून निघाली. विविध प्रकारचे चॉकलेट, केक तसेच खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नववर्षाच्या स्वागतासाठी दोन्ही पर्यटनस्थळे सज्ज झाली असली तरी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
You must be logged in to post a comment.