सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांवर पालिकेचा दणका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पालिकेच्या पथकाने यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या आवारातील दोन खासगी क्लासेसवर कारवाई केली. या कारवाईत संबंधितांकडून दीड हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा व्यापारी, विक्रेते, दुकानदार व नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार सर्वांनाच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक विक्रेते, दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केले जात असल्याने पालिका प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
पालिकेचे कोरोना विभाग प्रमुुख प्रणव पवार यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या आवारातील दोन खासगी क्लासेसवर कारवाई केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एका क्लासवर सोशल डिस्टन्सचे उल्लंंघन केल्याप्रकरणी एक हजार तर दुसऱ्या क्लासमधील व्यक्तीवर मास्क न लावण्याने पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार असून, नागरिक,व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!