सातारा, ( भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारच्या समता सैनिक दलातील अत्यंत प्रामाणिक असणारे सैनिक गौतम जाधव यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५५ होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. दरम्यान जाधव यांच्या निधनाने समता सैनिक दलासह परिवर्तनाच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.
कोरोनाचे निदान झाल्यानंतर जब्मो कोविड सेंटरमध्ये मागील २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारली होती. परंतु त्यानंतर हळूहळू खालावत राहिली आणि काल पहाटेच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहूली येथे त्त्यांच्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी त्त्यांच्या राहत्या घरी सदरबझार सातारा येथे जलदान विधी होणार पार पडणार आहे. यादरम्यान ठराविक सैनिकांच्या उपस्थितीत सैनिकी इतमामात सलामी देऊन श्रध्दांजली अर्पण केली जाणार आहे.
गौतम जाधव यांच्या निधनाने समता सैनिक दलातील प्रामाणिक सैनिक काळाने हिरावून घेतला असून समता सैनिक दलाला जाधव यांची कायम आठवण राहील, अशी भावना समता सैनिक दलाचे प्रमुख अरुणभाऊ पोळ यांनी व्यक्त केली. समता सैनिक दलाचे कमांडर इन चिफ जयसिंग सोरटे, लेप्टनंट देवेंद्र सपकाळ, कमांडर उत्तम कांबळे, संयोजा बल्लाळ, आकाश कांबळे, अश्विनीताई गंगावणे, प्रदीप माने यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
You must be logged in to post a comment.