सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्रीय वाणिज्य मंत्री सोम प्रकाश यांच्या हस्ते आज वाई येथील प्रसिद्ध महागणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय समिती द्वारे महाराष्टातील १६ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री पक्ष संघटनात्मक मजबूत करण्यासाठी समितीने एका मंत्र्यांची नियुक्ती केली असून सातारा लोकसभा मतदारसंघाची जवाबदारी केंद्रीय वाणिज्य मंत्री सोम प्रकाशजी यांचेकडे असल्याने आज पासून तीन दिवस ते सातारा मतदारसंघात दौरा करणार आहेत. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्याची सुरुवात सांस्कृतिक ठेवा असलेल्या व पौराणिक महत्त्व असलेल्या दक्षिणकाशी वाईनगरीतून करण्यात आले. मंत्री सोम प्रकाश यांचे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास महागणपती घाटावर आगमन झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, जिल्हा प्रभारी अतुल,भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, प्रदेश प्रतिनिधी मदन भोसले हे यावेळी उपस्थित होते.प्रारंभी मंत्री सोम प्रकाश यांच्या हस्ते कृष्णामाईची ओटी पूजन करण्यात आले व आरती करण्यात आली. तसेच महागणपती मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती ही करण्यात आली.
“मिशन २४” च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत मोहिमेला वाईतून चांगला प्रतिसाद मिळाला असून यानिमित्ताने भाजपचे सर्व कार्यकर्ते चार्ज झाल्याचे दिसून आले.यावेळी काशिनाथ शेलार, यशवंत लेले, रोहिदास पिसाळ, राकेश फुले, रामदास खरात, विजय ढेकाने , सचिन गांधी,सी व्ही
You must be logged in to post a comment.