सातारा,(अजित जगताप यांजकडून) : धोम धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या भीमनगर व दरे गावातील मागासवर्गीय ग्रामस्थांची पुनर्वसन मध्ये मिळालेली जमीन पुन्हा एकदा नवीन रेल्वे लाईनमुळे ताब्यात घेण्यात आली आहे. या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी भूमिपुत्र आमरण उपोषण करत आहेत तर दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रशासनाचे कोरेगाव महसूल अधिकारी खोटी माहिती देत असल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील मागास प्रवर्गातील भीमनगर व दरे गावातील लोकांचे वीस ते तीस वर्षापूर्वी पुनर्वसन झाले होते. त्यांना जमीन सुद्धा देण्यात आली होती परंतु या जमिनीवरून नवीन रेल्वे लाईन टाकण्यात आलेकी त्यांना त्या जागेचा मोबदला मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. नवीन रेल्वे लाईन मध्ये गेलेल्या जागेची मोजणी करून मागासवर्गीयांना मोबदला मिळावा. यासाठी भीमनगर दरे गावातील ग्रामस्थांनी दिनांक १० मार्च २०२३ रोजी उपोषण केले होते. त्यावेळेला सातारा उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे ,कोरेगाव प्रांताधिकारी अभिजीत नाईक व भूसंपादन अधिकारी जगताप व युवा नेते व उपोषणकर्ते रमेश उबाळे आणि आंदोलकांची पोलिसांनी चर्चा घडवून आणली होती .त्यामुळे आंदोलकांनी उपोषण सोडले होते.
तीन महिन्यानंतरही या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळे पुन्हा एकदा मंगळवारपासून भीमनगर व दरे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. यावेळी प्रांत अभिजीत नाईक यांनी सदर जमिनीच्या मोजणीसाठी मोजणी कार्यालयात पैसे भरले आहेत. असे काही आंदोलकांना सांगितले होते. परंतु, सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी भीमनगर व दरे गावाच्या मोजणीसाठी अद्याप ही पैसे भरले नसल्याची बाब आंदोलकांना सांगितल्यामुळे आंदोलकांनाही आश्चर्य वाटले.
याबाबत कोरेगाव प्रांताधिकारी यांनी मोजणीचे पैसे भरले आहेत. हे कशाच्या आधारावर सांगितले ? असा प्रति प्रश्न केला आहे.कोरेगाव येथील भूमी संपादन अधिकारी यांना जमिनी एकीकरण योजनेची माहिती नसल्यामुळे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा मोबदला मिळू शकत नाही. ही बाब सुद्धा अधोरेखित झालेली आहे.
सदर प्रश्नाबाबत सखोल अभ्यास करून मार्ग काढण्यासाठी दिनांक १३ ऑक्टोंबर २०२३ रोजी चार वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनकर्ते व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. असे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान,भीमनगर प्रश्नी प्रांत म्हणतात मोजणीला पैसे भरले तर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीसाठी पैसे भरले नसल्याचे सांगितले. या दोन्ही बाबी उघड झाल्याने आंदोलकांना लाभ देण्यापासून डावलले जात असल्याची बाब पुढे आली आहे .
दरम्यान,आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजता चर्चेच्या वेळेला सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, कोरेगावचे प्रांत अभिजीत नाईक, आंदोलनकर्ते रमेश उबाळे, भीमनगर सरपंच सुरेश कांबळे, सुधाकर कांबळे, नारायण लोखंडे, सखाराम ससाणे, विजय लोखंडे, दरे सरपंच आनंदा जाधव, मोहन सपकाळ , नितीन रोकडे, नायब तहसीलदार महेश उबारे ,भूमी संपादन अधिकारी श्री.जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.