ॲट्रॉसिटी कायदा लवचिक करण्याचा काहींनी घाट : दादासाहेब ओव्हाळ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे अनुसूचित जाती-जमातीचं संरक्षणाच कवच आहे. हाच ॲट्रॉसिटी कायदा लवचिक करण्याचा काहींनी घाट घातला आहे. त्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, याबाबत बुधवार दि. १९ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाईचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.

यावेळी किरण ओव्हाळ, किरण बगाडे, सोमनाथ धोत्रे, मदन खंकाळ, संतोष नलावडे, दिपक नलावडे, सागर फाळके, जयवंत कांबळे, राजेश ओव्हाळ उपस्थित होते.

ओव्हाळ म्हणाले, गृह मंत्रालयाकडून ॲट्रॉसिटी कायदा लवचिक करण्याबाबत प्रस्ताव तयार करीत आहे. यामध्ये इथून पुढे ॲट्रॉसिटीचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी करणार आहे. ॲट्रॉसिटी कायदा लवचिक झाल्यास त्याबाबतचे गांभीर्य कमी होणार आहे. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अन्यथा आम्ही बसणार नाही. ज्याप्रमाणे केंद्राने सूचना दिल्या आहे. त्याप्रमाणेच कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यात याबा, अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!