सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यातील कोरोनाची पार्श्वभूमीवर शासनाच्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत लॉकडाऊन कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट तसेच इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह वगळून) या बंद राहतील.
उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील. सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील, रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली आहे.
सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यात मनाई करण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बारर्स यांना ५० टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी देत आहे. बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शुटिंग रेंज इ. मधी सर्व खेळांमध्ये शारिरीक व स्वच्छता विषयक पालन करुन चालु करणेस परवानगी राहील. कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/ मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे बसण्याच्या ५० टक्के क्षमतेने चालू राहील. सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर ५०० रुपये दंड आकारावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आले आहेत
You must be logged in to post a comment.