सोनगाव कचरा डेपोला आग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोनगाव येथील कचरा डेपोला आज सकाळी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीनं काही क्षणातच रौद्ररुप धारण केल्याने परिसरातील रहिवाशी व वाहनचालकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

सोनगाव येथील कचरा डेपोला भीषण आग लागली होती. आगीच्या घटनेनंतर देखील तीन ते चार दिवस धुराचे लोट या कचरा डेपोतून निघत होते. या धुराचा सातारा शहर उपनगरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

या कचरा डेपोला अचानक आग लागल्याने या परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला. कचरा असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. त्यातच वारे वाहत असल्यानेही आग भराभर पसरली आणि आगीचं एकच तांडव निर्माण झालं. काही वेळातच आगीचे लोळ आणि धुरामुळे या परिसरातील तापमानात वाढ झाली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे अधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप स्पष्ट झाले

error: Content is protected !!