सोयाबीन शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी कटमारी थांबवा, अन्यथा रयत क्रांती तीव्र आंदोलन करणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोयाबीन शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी काटामारी थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या निसर्गाच्या लहरीपणाचा सोयाबीनला जास्त फटका बसला आहे

काही ठिकाणी सोयाबीन काढणी, तर काही ठिकणी कापणीचं काम सुरु आहे. एकीकडे अस्मानी संकट उभे असताना व्यापारीही सुलतानी लूट करीत आहे. राज्यात काही ठिकाणी शेतीमाल हमीभापेक्षा कमी किमतीत खरेदी केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सातारामध्ये व्यापारी सोयाबीन पिकाची खरेदी करताना मोठ्या प्रमाणात काटा मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. एकीकडे या भागातला शेतकरी अतिवृष्टीमुळे हैरान आहे. त्यातच शेतकऱ्यांची अशा प्रकारे होणारी लूट समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न बिकट होत चालले असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी रयत क्रांती जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा आघाडीचे उपाध्यक्ष प्रकाश साबळे व शेतकरी उपस्थित होते

error: Content is protected !!