सातारा, (भुमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून कास पठार पर्यटकांसाठी बंद होते. मागील आठवड्यात शासनाच्या वतीने कास पठार पर्यटकांसाठी पुढे करण्यात आले. आठवड्यापर्यंत सुमारे पाच हजार पर्यटकांनी कासला भेट दिली. एरव्ही कामाचा ताण व कायदा सुव्यवस्थेची जवाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सहकुटुब कासला भेट दिली.
पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल म्हणाले, कास पठार परिसराचे निसर्गसौंदर्य खूप सुंदर असुन वन व्यवस्थापन समितीचे नियोजन खूप सुदर आहे.कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा दिसला नाही. तसेच वनव्यवस्थापन समिती वन विभागाकडून कास पठाराच्या सौदर्यांचा प्रसार ही करतील अन संरक्षण ही करतील याची मला खात्री आहे
You must be logged in to post a comment.