सभापती सीता हादगे यांच्या वाढदिनी होणार विविध विकासकामांचा शुभारंभ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. सीता राम हादगे यांचा गुरुवार दि. १४ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत असून त्याचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक एकमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक एकमध्ये १५ लाख रुपये खर्चाचे शौचालय, पंताचा गोट येथे १५ लाख रुपये खर्चाचे शौचालय, कर्मवीर हाऊसिंग सोसायटी येथे ६५ लाख रुपयांचा मल्टीपर्पज हॉल, ७.५० लाख रुपयांची जिम, त्याच्या नजीकच ओढ्याला ७५ लाख रुपयांची संरक्षक भिंत, मनाली हॉटेल ते खंडोबा मंदिर दरम्यान १० लाख रुपये खर्चाचे गटर्स, खंडोबा मंदिरा पाठीमागे पवार मळा येथे २० लाख रुपये खर्चाचे गटर, बनसोडे वस्ती येथे ७५ लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत, गणेश कॉलनी अंतर्गत रस्ते, हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी असा विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व सर्व सभापतींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ, हारतुरे कोणीही आणू नये शक्य झाल्यास वह्या भेट म्हणून आणाव्यात जेणेकरून त्या वह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्यात येतील त्यांना शिक्षणासाठी त्या उपयोगी पडतील.तसेच सध्या कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत कठीण असून कुणीही विनाकारण बाहेर न पडता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घ्यावी.

– सौ.सीता राम हादगे, पाणी पुरवठा सभापती, सातारा नगरपरिषद सातारा.

error: Content is protected !!