साताऱ्यात मनसेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षावाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे असा आदेश दिल्यानंतर राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं आहे. राज्यभरातून सदस्य नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सातारा शहरातही शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सातारा शहरात मनसेने गंधर्व हॉल, पंतांचा गोट येथे या अभियानाची सुरुवात केली. या अभियानासंदर्भात बोलताना शहराध्यक्ष राहुल पवार म्हणाले, पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शहरात मनसे सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या नोंदणीचे स्वरूप ऑनलाईन, मिस कॉल, बार कोड स्कॅन तसेच प्रत्यक्ष फॉर्म भरून नोंदणी करणे असे आहे. याप्रमाणे सातारा शहरात प्रत्यक्ष फॉर्म भरून सदस्य नोंदणी झाली. विशेष म्हणजे यामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या प्रगत, उज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त शाहूनगरवासीयांनी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल पवार यांनी केले आहे.

यावेळी अॅड. मुश्ताक बोहरी, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, अझहर शेख, वैभव वेळापुरे, दिलीप मामा सोडमिसे, विभाग अध्यक्ष गणेश पवार, सागर पवार, शाखाध्यक्ष चैतन्य जोशी, अविनाश भोसले, सौरभ कोरडे, जिल्हाध्यक्ष चित्रपट सेना राज पुजारी उपस्थित होते.

error: Content is protected !!