महाविकास आघाडी सरकारने खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरु केले – सुनील केदार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सरडे (ता. फलटण ) येथील खेळाडू प्रवीण जाधव यांनी जपान येथील टोकीयो मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट रित्या खेळून आपले तालुक्याचे व राज्याचे नाव उज्वल केले आहे.  महाविकास आघाडीचे सरकार हे सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून खेळाडूंसाठी क्रीडा विद्यापीठाचा नुसता शब्द न देता किंवा घोषणा न करता प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू केलेले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली.   

सरडे( ता. फलटण) येथे ऑलिंपिक मध्ये भाग घेतलेला तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरी क्रीडा मंत्री ना. सुनील केदार यांनी भेट देऊन प्रवीण जाधव यांचा सन्मान व सत्कार केला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण,राष्टीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव,  फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बेडके, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महेश खुंटाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
     

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधील सरडे सारख्या छोट्याश्या गावामधून प्रवीण जाधव यांनी स्वतःची कला कौशल्य ओळखून क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाऊन तिरंदाजी बाबतचे शिक्षण घेतले तालुक्याचे व राज्याचे नाव उंचावले टोकियो येथील ऑलम्पिक मध्येही चांगली कामगिरी बजावली आहे पण या वेळेस नाही परंतु पुढच्या वेळेस प्रवीण हा देशासाठी व राज्यासाठी नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल असा विश्वास  सुनील केदार यांनी व्यक्त केला.

क्रीडामंत्री म्हणून काम करत असताना या विभागाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे राज्यांमध्ये विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. खेळाडू म्हणून खेळत असताना प्रत्येक जण उतरल्यानंतर प्रत्येकालाच मेडेल मिळेलच असे नाही,  परंतु खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांमध्ये यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे सर्व खेळाडूंसाठी पुणे येथील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे, असेही क्रीडामंत्री ना. सुनील केदार यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!