सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लोणंद-शिरवळ राज्यमार्गावर शिरवळ, ता. खंडाळा हद्दीत एसटी बसने दुचाकीला ठोकर दिली. यात बसचे चाक दुचाकीवरील दोघांच्या डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी चालक कुणाल संजय चव्हाण (वय १८), आदित्य देविदास चव्हाण (वय १४) असे जागीच ठार झाले. तर ओंकार संजय भोसले (वय १८ तिघे रा.लोणी ता.खंडाळा ) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, कुणाल चव्हाण हा शिक्षणासाठी चिपळूण जि.रत्नागिरी येथे जाण्यासाठी शिरवळला निघाला होता. त्याला सोडण्यासाठी ओंकार संजय भोसले व आदित्य चव्हाणक हे तिघे दुचाकी (क्र.एमएच-११-सीवाय-४८३६) वरून शिरवळला निघाले होते. ते शिरवळ गावच्या हद्दीत पोहचल्यानंतर समोर चाललेल्या हातगाडीला हातगाडीला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीच्या पाठीमागे असलेल्या एसटी चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समोरून आलेल्या वाहन आल्याने एसटीने दुचाकीला ठोकर मारली.
दुचाकी हातगाडीला धडकत दुचाकी महामार्गावर पडत काही समजण्याअगोदर नीरा-भोर या एसटी क्र. (एमएच-१४-बीटी-१०२०) चे डाव्या बाजूकडील चाक हे रस्त्यावर पडलेल्या दुचाकीचालक कुणाल चव्हाण व आदित्य चव्हाण याच्या डोक्यावरून गेल्याने दोघेही जागीच ठार झाले तर दुचाकीवरील ओंकार भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
You must be logged in to post a comment.