सातारा : एसटी विभागातील मेढा आगारातील चालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संतोष वसंत शिंदे (वय 34, रा. आसगाव, ता. सातारा) असे त्या चालकाचे नाव आहे.
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. शासनाकडून या संपावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वच एसटी कर्मचारी प्रचंड तणावा खाली आहेत. त्यानुसार चालक संतोष शिंदे हे गेली चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
You must be logged in to post a comment.