सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण आले असून
संपाच्या 9व्या दिवशी एका एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या आंदोलनाला गालबोट लागले आहे.
या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची होऊन यामध्ये मारहाणीची घटना घडली आहे. सातारा आगारातील वाहक क्रमांक 6623 राजू पवार याने वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांनी चिडून जाऊन डोक्यात दगड घातला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.