सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन मल्हार पेठ व गुरुवार पेठ येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच परिसरात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी पत्रकार संतोष शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होतांना दिसत नाही. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या तुलनेत सातारा शहरातील कोरोना बाधितांचा आकडा लक्षणीय आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास टेस्टिंग आणि लसीकरण वाढवणे खूप गरजेचे झाले आहे. सातारा शहरांत सध्या जिल्हा रुग्णालय, गोडोली, कस्तुरबा हॉस्पिटल अशा ठराविक ठिकाणीच लसीकरण केंद्र सुरू असून त्याठिकाणी शहरातील नागरिकांना लस देण्यात येत आहे.त्यामुळे येथील केंद्रांवर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचा परिणाम शहरातील ज्येष्ठ, अपंग ,तसेच महिला वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ताटकळत उभे असलेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावं लागत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून शहरांतील मल्हार पेठ व गुरुवार पेठ येथील नागरिकांसाठी याच परिसरात असणाऱ्या समाज मंदिर अथवा उपलब्ध असेल त्या शाळा, हॉल अशा ठिकाणी तत्काळ लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबण्यास मदत होईल.अशी मागणी पत्रकार शिंदे यांनी निवेदनात केली आहे.
मा.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची समक्ष भेट घेऊन मी त्यांना निवेदन दिले असून सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरण याअनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा केली. तसेच मल्हार पेठ आणि परिसरातील नागरिकांना कशाप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तेही प्रामुख्याने मी त्यांच्यासमोर मांडले. या सर्व प्रश्नांबाबत त्यांनी मार्ग काढू असे आश्वासन देऊन लवकरच त्या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करू असेही स्पष्ट केले आहे.
– संतोष शिंदे, पत्रकार
You must be logged in to post a comment.