कोरोना निर्बंधांसहीत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करा : अमित कुलकर्णी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय मागे घेऊन कोरोना निर्बंधांसहीत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी या साठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी सातारा आणि शिक्षणाधिकारी सातारा यांना देण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या मार्फत हे निवेदन भाजपा शैक्षणिक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/अतिदुर्गगम खे ड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.
           

राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांचेवर उपासमारीची नव्हे तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत,त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर पंधरा वर्षांवरील लसीकरण सुद्धा वेगाने होत आहेत.केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी.

सरकारने दिनांक २६ जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा आदेश द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे प्रत्येक जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा भारतीय जनता पार्टी ने दिला आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्च्या शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, आशुतोष चौधरी, अविनाश खर्शिकर, ओंकार रामदासी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!