सुदेष्णाने पटकावले अॅथलेटीक्स चॅम्पीयन शिपमध्ये सुवर्ण पदक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) –  पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय ज्युनिअर अॅथलेटीक्स  चॅम्पीयन शिपमध्ये साताराची धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवले आहे. तिची गुहाटी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे येथे झालेल्या राज्य स्तरीय ज्युनिअर अॅथलेटीक्स  चॅम्पीयन शिप 2 O2 1 मध्ये झालेल्या 18 वर्षाखालील मुलीच्या 100 व 200 मिटर धावणे क्रिडा प्रकारात कु . सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. 100 मिटर धावणे क्रिडा प्रकारात 11 .62 सेकंदाची वेळ नोदवत मुलीच्या 18 वर्षाखालील वयोगटात नविन विक्रम नोंदवला आहे . तसेच 200 मिटरमध्ये 24 .56 सेकंद अशी वेळ देवून दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक पटकवली आहेत . दि. 25 जानेवारी होणाऱ्या भोपाळ (मध्यप्रदेश ) व दि. 6 फेब्रुवारी रोजी गुहाटी (आसाम) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

तिला तिचे मार्गदर्शक कोच श्री बळवंत बाबर सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सातारा शहरात सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने सराव करणे अत्यंत अवघड होत आहे. तरीही तिने अप्रतिम कामागिरी केली आहे.

error: Content is protected !!