नागठाणे येथे ताडी कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : नागठाणे ता.जि.सातारा गावच्या हद्दीत बाबा पंजाबी ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा क्लोरेल हायड्रेडचा वापर करुन बनावट ताडी तसेच मानवी शरीरास घातक व विषारी क्लोरेल हायड्रेट तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून जवळपास ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.

या कारवाईमध्ये सुहास हणमंत सांळुखे, विजय जयसिंग सांळुखे, मे.कानी ओव्रसिस कार्पोरेशन, अतित ता.जि.सातारा कंपनीचा मालक मिलींद तुकाराम घाडगे सर्व राहणार नागठाणे ता.जि.सातारा यांना  १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली असून फरार आरोपी राजू व्यंकट नरसय्या भिमानाथीनी, रा.नेवोलीनाका, डोंबिवली कल्याण पूर्व जि.ठाणे यास दि.२५ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करुन त्यांचे विरुदध १) महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(ब)(ड)(ई) (फ),६८,८१,८३,९०,१०३ प्रमाणे. २) विष कायदा १९१९ चे कलम २ व ६ चे उल्लंघन ३) महाराष्ट्र विष नियम १९७२ चे कलम २ फ मध्ये क्लोरेल हायड्रेट समाविष्ट असुन ३ व १२ चे उल्लंघन ४) भारतीय दंडविधान संहिता १८६० चे नियम क्र.३२८ अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. वरील सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली असून गुन्हयातील संशयीत फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या  कारवाईमध्ये १५० लिटर क्लोरेल हायड्रेड युक्त बनावट ताडी, ७३५ कि.ग्रॅ. क्लोरेल हायड्रेड, एक चारचाकी वाहन एक २०० लि. क्ष.चा प्लॅस्टिक बॅरल व एक कॉम्प्रेसरसह एकूण ५,९७,११०/- रुपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक के.बी.बिरादार, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, सहा.दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम यांनी यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक के.बी.बिरादार करीत आहेत.

या गुन्ह्यातील आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी तयार करुन बनावट ताडी व त्यासाठी लागणारे क्लोरेल हायड्रेट तयार केल्याचे निष्पन्न  झालेले आहे अशा प्रकारची आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी जिल्ह्यात कुठेही बनावट ताडी व क्लोरेल हायड्रेटची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास तत्काळ द्यावी.

– अनिल चासकर, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क.

error: Content is protected !!