सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासन पुन्हा लाॅकडाऊन करण्याच्या विचारात आहे. राज्य शासनाचे शिक्षण विभागाकडे तर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होत असून गेल्या वर्षीपासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी भविष्यामध्ये शैक्षणिक स्पर्धेमध्ये कसे टिकतील, असा सवाल कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन अॅन्ड सोशल फोरम आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी केला आहे.
गेल्या वर्षापासून कोरोनाच्या आडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजीचा आव आणून राज्य शासन शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ करीत आहे. सरकार घेत असलेल्या निर्णयावरून असे निदर्शनास येत आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्राशी काही घेणे-देणे नाही. दहावी-बारावीच्या परिक्षांवर संकट आहे. तसेच यंदा घेतल्या जाणाऱ्या परिक्षांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा प्रश्न आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास प्रशासन लगेच शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस बंद करण्याचे आदेश काढते. मुलांना आॅनालाईन शिक्षण द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे भविष्य अंधारात असून सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशनच्यावतीने करण्यात आली आहे
You must be logged in to post a comment.