25 मे ते 1 जून पर्यंत आणखीन कडक निर्बंध

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे. या कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल
रुग्णालये ,निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, 24 तास औषध दुकाने औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण, व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स, दुध संकलन केंद्रे सकाळी 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल, शेती विषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खाते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने उघडता येणार नाहीत. तथापी सकाळी 07.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत घरपोच सेवा देणेस मुभा असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल.

शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील, ई – व्यापार फक्त (अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी), प्रसार माध्यमे, पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या सुट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील.

error: Content is protected !!