सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव येथील अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा पोलीस दलाच्या भरोसा सेलने केलेल्या कारवाईनंतर हा बालविवाह रोखला गेला.
सातारा जिल्हयामध्ये ९ मार्च २०२० रोजी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली होती. भरोसा सेलमध्ये विशेष बाल पथक, जेष्ठ नागरीक तक्रार निवारण व महिला सहायता कक्ष याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करुन समुपदेशन केले जाते.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी भरोसा सेल मध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना सूचना दिल्या आहेत. शाहुनगर बेघरवस्ती, कोरेगाव येथे एका अल्पवयीन बालिकेचा विवाह सातारा येथील शुभम सुरेश गायकवाड वय २५ वर्षे, रा.चंदननगर कोडोली, सातारा याच्याशी होणार असले बाबतची माहिती प्राप्त झाली. प्राप्त झाले बातमीचे अनुशंगाने किशोर धुमाळ यांनी भरोसा सेल सातारा येथील महिला सहायक पोलीस निरीक्षक अनिता आमंदे-मेणकर यांना प्राप्त झाले बातमीची शहानिशा करुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
सहायक पोलीस निरीक्षक अनिता आमंदे-मेणकर यांनी प्राप्त झालेल्या बातमीचे गांभीर्य लक्षात घेबून अल्पवयीन बालीका व मुलाचे आई वडीलांना भरोसा सेल सातारा येथे बोलावून घेवून त्यांना कायदेशीर बाबींची माहिती देवून तसेच त्यांचे योग्य प्रकारे समुपदेशन करुन होणारा बालविवाह रोखला आहे.
भरोसा सेलच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता आमंदे-मेणकर, पो.हवा.नंदकुमार चव्हाण, पो.ना.परशुराम वाघमारे, म.पो.ना.तृप्ती मोहिते यांनी कार्यवाही केली आहे.
You must be logged in to post a comment.