सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेतकरी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच वीज बिल भरणे शक्य नाही. शेतकऱ्यांना राज्य सरकारने कृषि संजीवनी योजना आणून वीज बिलात ३३% सवलत व बिंले भरण्यासाठी मार्च २०२२ पर्यंतची मुदत दिलेली आहे. तरीही महावितरण कंपनीकडून शेतीपंपाची कनेक्शन तोडणी सुरू आहे. ती तत्काळ थांबवा अशी मागणी र॒यत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्याकडे केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश (सोनू) साबळे व शेतकरी उपस्थित होते.
र॒यत क्रांती संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. यापुर्वीच पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहेत त्यात झालेल्या नुकसानीतून सावरणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिकीरीचे झाले आहे. त्यातच आपल्या महावितरण कंपनीने वीज तोडणीचे षडयंत्र चालू केले आहे. तरीतात्काळ सदरची वीज तोडणी बंद करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
You must be logged in to post a comment.