साताऱ्यात एकाने पोलीस कॉन्स्टेबलच्या कॉलरला घातला हात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज येथील निर्भया पोलीस चौकीत पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम यांची शनिवारी एकाने कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, दि. २३ रोजी सकाळी ११.०० वा. सुमारास पोलीस कॉन्स्टेबल सुहास कदम कर्तव्यावर हजरअसताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता.कराड हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पो.कॉ.सुहास कदम यांनी त्यातील एकाच्यामोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले असता, आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून कदम यांना आरेरावीची भाषा वापरुन वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्याबाबत पो.कॉ. सुहास कदम यांनी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

error: Content is protected !!