सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग होत आहेत. मानवाला ज्या काही समस्या आहेत. त्यावर उत्तर शोधण्याच काम संशोधक करीत असतात. सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असलेल्या इंधन दरवाढीच्या प्रश्नामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यातील तरुणांनी इलेक्ट्रिक आणि पेट्रोल अशा दोन्हींवर चालणाऱ्या स्कूटरचं माॅडेल बनवून नागरिकांना दिलासा दिला आहे.
सातत्याने वाढत असलेले इंधन दर, वाढते प्रदूषण यामुळे आजकाल दुचाकी चालवणेही सर्वसामान्यांना परवडत नाही. अशातच विजेच्या बॅटरीवर आणि पेट्रोल दोन्हीवर चालू शकणारी हायब्रीड स्कूटर नक्कीच फायदेशीर ठरणार असून यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी ही अनोखी किमया साधली आहे.सातारा येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रथमेश रणनवरे, सौरभ पाटील, किशोर पवार, संग्राम शिंदे, प्रज्योत कावडे, पुनम माने, मयुरी मोहिते यांनी इलेक्ट्रिक बॅटरी आणि पेट्रोल दोन्हीवर चालू शकणारी हायब्रीड स्कूटर तयार केली आहे.फक्त इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार्या वाहनांना येणारे अडथळे जसे इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनची कमतरता, ग्रामीण भागात वापरण्यावर येणारी मर्यादा या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी हायब्रीड स्कूटर तयार केली आहे. यामध्ये पुढील चाकाला विजेच्या बॅटरीची जोडणी तर मागील चाकाला पेट्रोलवर गती प्राप्त होणार आहे. यामुळे दोन चाकी वाहनांमध्ये नक्कीच क्रांती येईल.
या उपक्रमास विभागप्रमुख किशोर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेली स्कूटर चालवून विद्यार्थ्यांचे कौतुकही केले आहे..
You must be logged in to post a comment.