सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील काल सहा विद्यार्थी तर आज १४ विद्यार्थी पॉझिटीव्ह सापडल्यामुळे पालकांच्यात भीती व्यक्त होत आहे. दरम्यान शाळा किती दिवस बंद राहील याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या दि २७ रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
आज सायंकाळी आलेल्या कोरोना अहवालानुसार शाळेतील १४ मुले मुली कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात वेटने तीन, नेर एक, पुसेगाव पाच, काटकरवाडी एक ,रेवलवाडी एक, बुध दोन तर विसापूर येथील एका विद्यार्थ्यांनाच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत सध्या सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घ्यावी असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी केले आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक शनिवारी दि २७ रोजी पुन्हा होणार असून त्यात शाळा कधी पुन्हा चालू करायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून इ पाचवी पासूनचे वर्ग शासनाने सुरु केले,वास्तविक पाहता लहान मुलांना कोरोना बाबतीत काय आणि कशी काळजी घ्याची याचे भान नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे काही पालकांचे मत आहे.
You must be logged in to post a comment.