सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या मुद्यावरुन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी खासदार शरद पवार यांना उद्देशून टीका करण्यास सुरवात केली आहे. या टीकेचा समाचार फलटण येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी पत्रकाव्दारे घेतला आहे.
शिंदे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देशातील थोर नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याएवढी तुमची उंची नसून कर्मवीरांनी स्थापलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतिहास आणि त्यातील पवार कुटुंबियांच्या योगदानाची माहिती घेण्यावी. राष्ट्रवादीतून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी तुम्ही उतावीळ असायचा, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
You must be logged in to post a comment.