हिंदवी पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक विनोद दाभाडे यांचे यश


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे मान्यतेने महाराष्ट्र राज्य कोचेस कमीशीन ने मुंबई विलेपार्ले येथे नुकत्याच दरम्यान झालेल्या सी.सी.सी.पी कोर्स मध्ये हिंदवी पब्लिक स्कुलचे क्रिडा शिक्षक विनोद दाभाडे यांनी संपुर्ण राज्यातुन चतुर्थ क्रमांक पटकावला.

त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व कोल्हापुर विभागीय सचिव योगेश मुंदडा यांनी अभिनंदन केले.

या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना हिंदवी पब्लिक स्कुलचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी संस्थेचे क्रिडा शिक्षक विनोद दाभाडे यांनी नेहमीच विद्यार्थ्याचे शारीरीक तंदुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे. त्यांचेकडे बॉक्सिंग मध्ये सराव करणाऱ्या साताऱ्यातील व शाळेतील अनेक खेळाडुनी राज्य व राष्ट्रीयस्तारवर पारितोषिक घेतली आहेत. या कोर्सचे माध्यमातुन मिळालेल्या ज्ञानाचा ते नक्कीच शाळेतील विद्यार्थी व सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेसाठी उपयोग करुन आदर्श खेळाडु तयार करतील अशी आशा बाळगतो असे म्हटले.

या सत्काराला उत्तर देतांना विनोद दाभाडे यांनी म्हटले की मी माझ्या बॉक्सिंग मधिल ज्ञानाचा उपयोग करुन जास्तीजास्त खेळाडु घडवणेचा प्रयत्न केला आहे. यापुढे या कोर्सचे माध्यमातुन मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन हिंदवी शाळेचे व सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे नाव राज्यभर करुन जास्तीजास्त आदर्श खेळाडु निर्माण करणेचा प्रयत्न करेन असा विश्वास देतो.

या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक संदीप जाधव, गौरव माने, कुणाल कायमकुडे, श्रीकृष्ण सपकाळ, ओमकार रामदासी, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


error: Content is protected !!