सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अथणी शुगर्स- रयत साखर कारखान्यातर्फे यंदाच्या गळीत हंगामातील उसास प्रतिटन दोन हजार ९२५ रुपये एकरकमी एफआरपी देण्यात येईल, अशी घोषणा अथणी शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी केली. दरम्यान, अशी घोषणा करणारा रयत एकमेव कारखाना ठरल्याने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडीही फुटली आहे.
शेवाळेवाडी- म्हासोली, ता. कराड येथील अथणी रयत शुगर्सच्या गळीत हंगामाचा प्रारंभ रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी शुगर्सचे संचालक योगेश पाटील, युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.