ऊसाचे बिल न दिल्यास कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सन २०२०-२०२१ च्या ऊस गळितास तोडून नेलेल्या ऊस बिलाची ‘एफ.आर.पी.ची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ दिवसाच्या आतजमा करणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन ऊसाचे गाळप करूनसुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यावर एफ.आर.पी.ची रक्‍कम जमा केलेली नाही. तरी येत्या चार दिवसात एफ.आर.पी.ची रक्‍कम जमा न केल्यास रयत क्रांती संघटनेमार्फत आंदोलन  करुन ऊस कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारु इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा उपाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

निवेदनात म्हटले आहे की,  सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या तोडून नेलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.ची रक्‍कम १४ दिवसाच्या आत देणे बंधनकारक असतानासुघ्दा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी लाखो टन ऊसाचे गाळप केलेले आहे. परंतु सदर तोडून नेलेल्या ऊसाच्या बिलाच्या एफ.आर.पी.च्या रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या नाहीत. सदर बाब ही शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील साखर कारखानदार सदर एफ.आर.पी.ची रक्‍कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत नाहीत.

तरी हंगामातील गाळप झालेल्या ऊसाची एफ.आर.पी.ची रक्‍कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात यावी. सदरची एफ.आर.पी.ची रक्कम येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा संघटनेचे कार्यकर्ते साखर कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील. यासाठी आपल्या जिल्हा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना तात्काळ सदर बाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी रयत क्रांतीचे उपाध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

error: Content is protected !!