कोरोनाच्या महामारीत सडून मरण्यापेक्षा लढून मरू : सुहास राजेशिर्के

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या महामारीत सडून मरण्यापेक्षा लढून मरू, असे सांगतानाच, आपल्या मूळ गावाच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याची ग्वाही सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिली.

वेहेळे, ता चिपळूण गावचे सुपुत्र असणारे सुहास राजेशिर्के यांनी आज वेहेळे गावामधील अत्यंत गरजू व्यक्तींना धान्याचे आणि संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप केले. गावच्या मातीचे समरण ठेवून राबवलेल्या या उपक्रमाचेचे गावकऱ्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.

कोरोनाच्या काळात एकमेकांना मदत करूनच या संकटाशी दोन हात करणे गरजेचे आहे. ज्या मातीला, ज्या माणसांना मी लहानपणीच दुरावलो, त्यांची आठवण या संकटकाळात मला आवर्जून झाली. माझ्या परीने मी माझ्या मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.

यावेळी वेहेळे गावचे सरपंच दिलीप राजेशिर्के, माजी उपसरपंच प्रकाश भोजने, सौ. लंबाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पोफळी गट युवक अध्यक्ष उदय भोजने, ग्रा. पं. सदस्य रोहित गमरे, सौ. निकिता राजेशिर्के, सौ. मृणाली कदम, सौ. जंगम, सौ. लाड, तसेच सामाजिक कार्यकर्ते अनंत लंबाडे, नितीन राजेशिर्के, राम राजेशिर्के, संजय जाबरे, शांताराम जाबरे, बाळा घाणेकर, मंदार राजेशिर्के, उदय शिर्के, संतोष कदम, संदेश महाडिक, सुशील खेडेकर, सतीश राजेशिर्के, संजय पडयाल, संजय होडे, यतीराज होडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच दिलीप राजेशिर्के यांच्या हस्ते सुहास राजेशिर्के यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमारे 60 ग्रामस्थाना धान्यकिटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन उदय भोजने व राम राजेशिर्के यांनी केले.

error: Content is protected !!