वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण तालुक्यातील पांढरपाणी येथील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत वनरक्षक अवधुत सुभाष पिसे (वय ३५, सध्या रा. मोरगिरी मुळ रा. माधवनगर, सांगली) याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

याबाबत माहिती अशी की, ढेबेवाडी वन्यजीव क्षेत्रातील नियत क्षेत्र आटोली परिसरातील आटोली ते पांढरपाणी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत शुक्रवारी वनरक्षक अवधुत पिसे यांनी गळफास लावुन आत्महत्या केली. एका सहकाऱ्याने त्यांना शनिवारी कामावर जाण्यासाठी फोन केला असता त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. तो कामावर पुढे गेला असेल म्हणुन सदर कर्मचारी संरक्षण कुटीकडे गेला असता त्यास आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!