मुंबई,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.यामध्ये डिजिटल मिडिया परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सनी शिंदे आणि सिंधुदुर्ग येथील पुढारी चॅनलचे ब्युरो चीफ विकास गावकर यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा एस.एम.देशमुख यांनी केली आहे. शिंदे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची तर गावकर यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात डिजीटल मिडियाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सनी शिंदे यांनी परिषदेचं भक्कम संघटन सातारा जिल्ह्यात उभारलं आहे. जिल्ह्यातील युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलचे संपादक परिषदेच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. विविध उपक्रम राबवून त्यांनी संघटन मजबूत केले.त्यामुळे राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येत आहे. तसेच गावकर यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल मिडियातील पत्रकारांना एकत्र करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्याची जबाबदारी देण्याचा निर्णही परिषदेने घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सनी शिंदे यांचेकडे पश्चिम महाराष्ट्र आणि गावकर यांचेकडे कोकणात संघटन उभारणे, मजबूत करणे,दौरे करणे, नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्तीसाठी नावांची वरिष्ठांकडे शिफारशी करणे आदी जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत.सातारा येथे लवकरच डिजिटल मिडिया परिषदेची कार्यशाळा होत आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या समन्वयातून ही कार्यशाळा यशस्वी करण्याची जबाबदारी देखील सनी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली असून कार्यशाळेच्या वेळेस राज्यकार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक आणि डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सनी शिंदे आणि विकास गावकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सनी शिंदे यांची निवड झाल्यानंतर पुणे विभागाचे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, विनोद कुलकर्णी, जीवनधर चव्हाण, दीपक प्रभावळकर, दीपक शिंदे,चंद्रसेन जाधव ,सुजीत आंबेकर, तुषार भद्रे, विठ्ठल हेंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील प्रिंट, डिजिटल मिडियातील सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
You must be logged in to post a comment.