सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पार्किन्स या आजारावर सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात मोठा वाटा होता. अंत्यविधी आज दुपारी २ वाजता (कवठे ता. वाई) येथील वैकुंठ स्मशानभूमीत झाला. यावेळी जिल्ह्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.