कराड दक्षिण मध्ये उदयनराजेंचा झंझावात; श्रीनिवास जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): स्वातंत्र्यानंतर एकतर्फी सत्ता असताना शाश्वत विकास करण्यापासून काँग्रेसला कोणी थांबवलं होतं? देशात जो काही शाश्वत विकास दिसतो आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षातील कार्यकाळातच झालेला आहे, असे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सैदापूर ता. कराड येथील श्रीनिवास जाधव यांच्या निवासस्थानी रविवारी सकाळी उदयनराजेंनी भेट दिली. या ठिकाणी विविध विषयांवर मान्यवरांसोबत चर्चा झाली. यावेळी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना उदयनराजे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई शिंदे, ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य एडवोकेट भीमराव शिंदे, विवेक जाधव विजय जाधव, सैदापूरचे माजी सरपंच मोहनराव जाधव शिवाजीराव देवकर धनाजी जाधव मुरलीधर जाधव लहूराज जाधव रघुनाथ जाधव महेश चव्हाण, बनवडी चे विजय गुरव सौरभ जाधव यांची उपस्थिती होती.
छ उदयनराजे म्हणाले, मी तीस वर्षांपूर्वी सामाजिक कार्याला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रगतीचा आणि समतेचा विचार घेऊन मी कार्यरत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हाच विचार घेऊन वाटचाल सुरू ठेवली आहे. नजर कधीच खोटे बोलत नसते. स्वातंत्र्यानंतर जो विकास काँग्रेसला करता आला नाही, तो मोदींच्या नेतृत्वाखाली दहा वर्षांमध्ये देशभरात झालेला आहे. लोकांना गृहीत धरून चालत नाही तर त्यांना चांगला पर्याय निर्माण करून द्यावा लागतो. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी जो विचार घेऊन समाजकारण केले तोच विचार घेऊन महायुती खंबीरपणे वाटचाल करत आहे. सर्वसामान्याचे हित जोपासत आहे, असेही श्री छ उदयनराजे म्हणाले.
रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत राजघराण्याचे मोठे योगदान
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी शिवधनुष्य हाती घेतले. कर्मवीरांना यासाठी राजघराण सर्वतोपरी मदत केली. राजघराण्याच्या जमिनी शिक्षण संस्थेसाठी देऊ केल्या. सर्व सामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षण घेऊन उंची गाठावी, यासाठी रयतचे मोठे योगदान आहे. कमवा शिका योजना सुरू करण्यासाठी राजघराण्यानेच जमीन उपलब्ध करून दिली, याचा मला सार्थ अभिमान आहे असेही खासदार श्री. छ. उदयनराजे म्हणाले.
You must be logged in to post a comment.