स्वातंत्र्य दिनी मिठाई वाटप करण्यास मनाई


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनी  जिल्ह्यामध्ये मिठाई,  खासकरुन जिलेबीचे वाटप करण्यास जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मनाई केली आहे .

या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होवुन, सार्वजनिक आरोग्य धोक्यात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये  कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास दि. 15 ऑगस्ट रोजी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्राप्त असलेल्या अधिकारानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मनाई केली आहे.
error: Content is protected !!