सैनिक स्कुलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील सैनिक स्कुल मध्ये कोरोना रुग्णांकरिता कोविड सेंटर सुरू करावे .अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजू शेळके यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात केलेल्या मागणी बाबत त्यांनी सांगितले की, हे स्कुल निवासी स्वरूपाचे आहे इथे साधारणतः ५००बेड उपलब्ध आहेत.तसेच शौचालय, मेस साठी लागणारे प्रशस्त किचन, पाणी, प्रशस्त जागा मध्यवर्ती ठिकाण आणि एन. सी. सी चा बसुन असलेला कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. सिव्हिल व जम्बो रुग्णालाया पासुन हाकेच्या अंतरावर आहे. जे रुग्ण कोरोना च्या धोक्यातुन जरा बरे झाले आहेत परंतु निगराणी खाली ठेवणे गरजेचे आहे अश्या रुग्णांना नवसंजीवनी मिळु शकते. अनेक जिव वाचु शकतात . परवा जम्बो च्या पार्किंग मध्ये दोन जिव गेले ते अश्या पध्दतीने प्रशासनाने काळजी घेतली असती तर कदाचित वाचले असते.अजुन किती काळ पर्यंत हे कोरोना संकट राहणार आहे हे माहीत नाही .शासन व प्रशासन अश्या स्वस्तातल्या उपाय योजना का करत नाहीत हेच कळत नाही. येथील कर्मचाऱ्याचा पगार तर दर महिन्याला दिला जातोयच. हा खर्च तर शासन करतच आहे मग या कर्मचाऱ्यांचा रुग्ण सेवेसाठी उपयोग करून घेताईल.या पद्धतीने नियोजन केले गेले तर नक्कीच याचा उपयोग सर्व सामान्यांना होईल

error: Content is protected !!