सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे. आता कार्यकर्त्यांनी काहीसा आक्रमक पावित्रा घेतला आहे. साताऱ्यात बाॅम्बे रेस्टाॅरन्ट परिसरात आज स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको केला.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनावेळी बाँबे रेस्टॉरंट परिसरातील रस्ता रोखत शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, मनोहर येवले, हेमंत खरात व शेतकरी सहभागी झाले होते.
You must be logged in to post a comment.