स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोल्हापूर येथे खासदार राजू शेट्टीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महावितरण विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ, अन्यायकारक वीजबील वसुलीच्या विरोधात, खोटी बीले रद्द करणेसाठी व दिवसा १० तास अखंडीत वीज मिळवण्यासाठी बेमुदत ठीय्या आंदोलन कार्यालय कोल्हापुर येथे आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनास पाठींबा म्हणून व सरकारने नुकताच घेतलेला एफआरपी चे दोन तुकडे करणार्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृष्णनगर येथील महावितरण कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलनकर्ते कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून बसल्याने पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला बसण्याची विनंती केली. मात्र, आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसानी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
महावितरणकडुन वीजपुरवठा खंडीत करण्याचा सपाटा चालू आहे.त्यामूळे शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जून साळूंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ, फलटण तालुका उपाध्यक्ष शकील मणेर, राजु घाडगे, उमेश घाडगे, दत्तात्रय पाटील, सुधाकर केसुगडे, संदीप घाडगे, रणजीत बागल, रामचंद्र मोरे, सुभाष नलावडे, जेष्ठ नेते मूरलीधर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, हेमंत मोरे, जनार्दन आवारे, निलेश भोसले, हेमंत खरात व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

error: Content is protected !!