तहसील कार्यालयात सोमवारपासून नो पार्किंग झोन

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात कोरोना-19 या संसर्गजन्य आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सिंग) पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (दि. 22) जून 2020 पासून या दोन्ही कार्यालयांच्या आवारात ’नो पार्किंग झोन’ पाळण्यात येणार आहे.
 

संपूर्ण आवारात खाजगी वाहनांना (चारचाकी, तीनचाकी, दोनचाकी) प्रवेश दिला जाणार नाही. या परिसरात येणार्‍या नागरिकांनी आपली वाहने आपापल्या जबाबदारीवर सुरक्षित ठिकाणी लावावीत. तहसील कार्यालयाच्या परिसरात अनधिकृतपणे वाहन पार्किंग केल्याचे आढळून आल्यास पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.



Attachments area



error: Content is protected !!