सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाहने चालवताना वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच बसचालकांनी स्वत:च्या शारीरीक, मानसिक आरोग्याची काळजीही घ्यायला हवी. शरीर व मन तंदुरुस्त असेल तर वाहने चालवताना अपघात घडणार नाही. रस्ते अपघात होवूच नयेत यासाठी बसचालकांच्या आरोग्य तपासणीचा हा उपक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालयात राबवण्यात आला या उपक्रमास उत्स्फूर्तपणे बसचालकांनी प्रतिसाद दिला.यापुढे असाच संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम तालुकानिहाय राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा आणि क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बसचालकांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर श्री. विनोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी बसचालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमा गांधी, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक प्रकाश गवळी, नेत्र तंत्रज्ञ एम. बी. शिंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रकाश गवळी यांनी आरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे स्वागत करुन बस चालकांनी वर्षातून एकदा तरी नेत्र व संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
डॉ. प्रमा गांधी यांनी वाहनचालकांच्या आरोग्याची तपासणी करून वाहनचालकांना समुपदेशन केले. तसेच रक्तदान, रक्तातील साखर, रक्तातील काविळ इ. तपासणी करुन निदान झालेल्या वाहनचालकांना औषधोपचार व त्याबाबत मार्गदर्शन केले.
रक्तदाब व रक्तातील साखर यासाठी श्रीमती ईला ओतारी व श्रीमती मानसी सपकाळ यांनी काम पाहिले. रक्तातील कावीळ व एडस पावावत श्रीमती रुपाली कदम यांनी तपासणी व जनजागती केली. मौखिक आरोग्य श्रीमती दिपाली जगताप, अनिकेत गावडे यांनी तपासणी करून धूम्रपान विषयक जनजागती व कॅन्सर विषयक तपासणी केली. या शिबिरात एम. बी. शिंदे, एन. डी. पिसे, वाय. व्ही. पाटोळे, एस. के. नायकवाडी या तंत्रज्ञांनी बसचालकांची नेत्रतपासणी केली. यामध्ये ९३ वाहनचालकांना दृष्टीदोष आढळून आला. त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून ज्या वाहन चालकांना मोतीबिंदू आढळला आहे त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. श्रीमती अपर्णा बल्लाळ यांनी बसचालकांचे मानसिक आरोग्य तपासणी करुन व त्याबाबत समुपदेशन केले.
नेत्र व आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी, सुरेश माळी, गजानन गुरव, दिग्विजय जाधव, योगेश ओतारी व सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक दाऊद मुश्रीफ, विनायक सुर्यवंशी, प्रसाद सुरवसे, राहुल घवरे, राजेंद्र दराडे, संग्राम देवणे, अमित रोकडे, श्रीमती सुप्रिया गावडे, श्रीमती मोनिका सांळुखे, श्रीमती तेजस्विनी कांबळे, श्रीमती मेघाराणी काशिद, श्रीमती शिवदिनी लाड, श्रीमती भारती इंगळे, श्रीमती शितल घाडगे यांनी योगदान दिले.
सर्व सुविधा मोफत मिळणार
या शिबिरात १५० बसचालकांची संपूर्ण आरोग्य व नेत्र तपासणी करुन ज्यांना दृष्टीदोष आढळला त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप पुढील टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच रक्तदाब, रक्तातील साखर, दंतवैद्य इ. आजारावरही मोफत औषधोपचार देण्यात येणार असल्याचे श्री. विनोद चव्हाण यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.