Skip to content
Tuesday, December 24, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
सातारा
तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
सातारा
तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
13th August 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): तारळी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून ध
र
णामधील पाणीसाठा सांडव्यावरुन वाहण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता एकूण पाणीसाठा 71.25 टक्के झालेला असुन पाणीपातळी 702.15मी. आहे. धरणामधील पाणीसाठा सांडावा पातळीपर्यंत (म्हणजेच 706.30 मी.) पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे 2000 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे.
परिणामी धरणाच्या खालील बाजूस तारळी नदीमधील पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. अशी स्थिती येथुन पुढे पर्जन्य कालावधीमध्ये केव्हाही उद्भवू शकते. त्यामुळे तारळी नदीकाठ लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये. तसेच नदीकाठालगत असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल इंजिन अथवा तत्सम सामुग्री आणि पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता कण्हेर कालावे विभाग क्र. 2, करवडी (कराड) यांनी दिल्या आहेत.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
कोरोनाबाधितांचा उच्चांक : 304 बाधित
जिल्ह्यात आणखी नऊ जणांचा मृत्यू
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.