कारच्या धडकेत शिक्षक ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरालगत मोळाचा ओढा येथे आज (शुक्रवार) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना एका कारने धडक दिली. या घटनेत शिक्षक असलेले अनिल दरेकर (रा. तामजाईनगर, सातारा) हे जागीच ठार झाले. दरम्यान, आणखी एकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ही घटना आज सकाळी ६ वाजता घडली आहे. अनिल दरेकर हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी ते चालत असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली. यावेळी त्यांच्या पुढे असणाऱ्या दशरथ फरांदे (रा. तामजाईनगर) यांनाही धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!